free counters

Monday, June 27, 2011

मी वळूनी हासले, चुकले जरासे (गझल)


प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे

उत्तराशी थांबले, चुकले जरासेशीळ त्याची ओळखीची रानभूली

मी वळूनी हासले - चुकले जरासेपाळले ना भान तू मज छेडतांना

लाजले मी लाजले, चुकले जरासेभावनांना बांधले त्या, धुंद राती

आज का सैलावले चुकले जरासेबंद होते द्वार माझे तव सुरांना

का कशी नादावले - चुकले जरासेरोखले मी आसवांच्या आठवांना

शेवटी रागावले - चुकले जरासेसोडतांना गांव जे मन घट्ट केले

त्या तिथे रेंगाळले चुकले जरासेसांजछाया दाटल्या या अंगणाशी

मी पुन्हा भांबावले, चुकले जरासेसंध्या

२६.११.२०१०

1 comment:

  1. Ratnagiri Property is great place for meditation, eco living and cultural place, it's best tourism place must visit yearly.. i found many informative info from this post and blog

    ReplyDelete